Rajendra Ghorpade
banner
rajendraghorpade.bsky.social
Rajendra Ghorpade
@rajendraghorpade.bsky.social
आईचे मौन : भारतीय संस्कृतीतील ‘त्याग’ की पिढ्यानपिढ्या लादलेला अन्याय ?

( एन. शिवदास यांच्या ‘हिंदू महाजन’ कादंबरीच्या संदर्भात भारतीयत्वाचा शोध ) भारतीय संस्कृतीत ‘आई’ ही केवळ एक नात्याची संज्ञा नाही, तर ती त्याग, ममता, सहनशीलता आणि मौन यांची प्रतीकात्मक मूर्ती मानली जाते. “आई म्हणजे देव”,…
आईचे मौन : भारतीय संस्कृतीतील ‘त्याग’ की पिढ्यानपिढ्या लादलेला अन्याय ?
( एन. शिवदास यांच्या ‘हिंदू महाजन’ कादंबरीच्या संदर्भात भारतीयत्वाचा शोध ) भारतीय संस्कृतीत ‘आई’ ही केवळ एक नात्याची संज्ञा नाही, तर ती त्याग, ममता, सहनशीलता आणि मौन यांची प्रतीकात्मक मूर्ती मानली जाते. “आई म्हणजे देव”, “आईच्या चरणी स्वर्ग”, “आईचे ऋण कधी फिटत नाही”—अशा असंख्य उक्ती भारतीय समाजमनात खोलवर रुजलेल्या आहेत. परंतु या गौरवाच्या शब्दांआड लपलेले एक कटू वास्तव आहे, जे साहित्याच्या आरशातूनच स्पष्टपणे दिसते. एन. शिवदास यांची हिंदू महाजन ही कादंबरी याच वास्तवावर बोट ठेवते आणि एक मूलभूत प्रश्न उपस्थित करते—आईचे मौन हे खरेच त्याग आहे का, की समाजाने पिढ्यानपिढ्या तिच्यावर लादलेला अन्याय ?
iyemarathichiyenagari.com
February 9, 2026 at 7:42 PM
शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज

संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले तर अनुभव येत नाही. विवहळता; दुःख दैन्य पदरात असेल, आर्थिक चंचन असेल तेव्हा गणगोत मित्र काम करीत नाही. तेव्हा श्री संत गजानननाचा…
शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज
संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले तर अनुभव येत नाही. विवहळता; दुःख दैन्य पदरात असेल, आर्थिक चंचन असेल तेव्हा गणगोत मित्र काम करीत नाही. तेव्हा श्री संत गजानननाचा अनुभव येतो. सौ पुष्पा सुनीलराव वरखेडकरमाजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा; वरुड९४०४८६०११३ ऐसी कळवळ्याची जाती !करी लाभाविन प्रीती ! या संत वचनानुसार जगात एक जन्मदात्री आई व दुसरे संत हेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी झटत असतात.'सर्व भूतमात्रा विषयी ज्यांच्या अंतकरणात निरहेतुक प्रेम व दया वसत असते. श्री गजानन महाराज एक संत रत्न वऱ्हाडात शेगाव येथे होऊन गेले.
iyemarathichiyenagari.com
February 9, 2026 at 7:15 AM
पंतप्रधान संसदेत असुरक्षित…

स्टेटलाइन – राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण ऐकून त्याला सविस्तर उत्तर देण्याची संधी सरकारने गमावली. सरकारने काही तरी दडवले, लपवले असा संदेश त्यातून सर्वत्र गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला लोकसभेत धोका होता तर तो नेमका कोणापासून, याची चौकशी होणार…
पंतप्रधान संसदेत असुरक्षित…
स्टेटलाइन – राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण ऐकून त्याला सविस्तर उत्तर देण्याची संधी सरकारने गमावली. सरकारने काही तरी दडवले, लपवले असा संदेश त्यातून सर्वत्र गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला लोकसभेत धोका होता तर तो नेमका कोणापासून, याची चौकशी होणार का ? डॉ. सुकृत खांडेकर काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यापासून भाजपा विरूध्द काँग्रेस अशा संसदेतील संघर्षाला धार चढली आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केली. काँग्रेसला देशभरात कमजोर करणे हा अजेंडा गेली बारा वर्षे भाजपाकडून राबवला जातो आहे. लोकसभेत व राज्यसभेत विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस पक्षाकडे आहे.
iyemarathichiyenagari.com
February 9, 2026 at 6:06 AM
अमेरिकेबरोबरचा व्यापार करार – घी देखा बडगा नही देखा सारखी स्थिती होऊ नये !

अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार कराबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही महिने सुरू होते. किंबहुना भारतीय उत्पादनांवर एकूण ५० टक्के आयात शुल्क लादल्याने व्यापारी करार करण्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. अखेर गेल्या सोमवारी…
अमेरिकेबरोबरचा व्यापार करार – घी देखा बडगा नही देखा सारखी स्थिती होऊ नये !
अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार कराबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही महिने सुरू होते. किंबहुना भारतीय उत्पादनांवर एकूण ५० टक्के आयात शुल्क लादल्याने व्यापारी करार करण्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. अखेर गेल्या सोमवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्यापार करार केल्याची एकतर्फी घोषणा केली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास दुजोरा देऊन अमेरिका व डोनाल्ड ट्रम्प यांचे खास आभार मानले. आपले आयात शुल्क १८ टक्क्यांवर आले असले तरी अमेरिकेने "त्यांना जे हवे तेच" या निमित्ताने मिळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर " घी देखा पर बडगा नही देखा " अशी आपली स्थिती होऊ नये अशी अपेक्षा आहे.
iyemarathichiyenagari.com
February 8, 2026 at 6:47 PM
सत्याची अनुभूती म्हणजेच ब्रह्मानुभव

तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - तेथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखें एक, विषय एकाहून एक भिन्न हे कांही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता…
सत्याची अनुभूती म्हणजेच ब्रह्मानुभव
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - तेथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखें एक, विषय एकाहून एक भिन्न हे कांही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता येत नाही. तेकसे तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात. ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायातील ही ओवी म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानाचा अत्यंत सूक्ष्म, पण अनुभवाच्या पातळीवर नेणारा विचार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज इथे आत्मा, ब्रह्म आणि विश्व यांच्यातील भेद कसा नाहीसा होतो, हे सांगताना केवळ तात्त्विक विधान करत नाहीत, तर ते एक अशी अनुभूती शब्दांत उतरवतात, जी बौद्धिक समजुतीच्या पलिकडे जाते.
iyemarathichiyenagari.com
February 8, 2026 at 7:27 AM
अमेरिका–भारत अंतरिम व्यापार करार शेतकऱ्यांच्या हितावर घाला – संयुक्त किसान मोर्चाचा आरोप

पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी १२ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन व संपाचा इशारा नवी दिल्ली - अमेरिका–भारत दरम्यान प्रस्तावित असलेल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा हा भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण…
अमेरिका–भारत अंतरिम व्यापार करार शेतकऱ्यांच्या हितावर घाला – संयुक्त किसान मोर्चाचा आरोप
पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी १२ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन व संपाचा इशारा नवी दिल्ली - अमेरिका–भारत दरम्यान प्रस्तावित असलेल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा हा भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर घाला घालणारा असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चा (SKM) यांनी केला आहे. या कराराद्वारे केंद्रातील RSS–BJP सरकारने अमेरिकन कृषी बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर पूर्ण शरणागती पत्करल्याचा आरोप करत SKM ने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) कडून जाहीर करण्यात आलेल्या कराराच्या चौकटीचा संदर्भ देत SKM ने म्हटले आहे की, भारताने अमेरिकन औद्योगिक आणि कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी किंवा पूर्णतः शून्य करण्यास मान्यता दिली आहे.
iyemarathichiyenagari.com
February 8, 2026 at 6:57 AM
राखेतून उभारी घेणाऱ्या माणसांचा कथासंग्रह : ‘फिनिक्स’

जीवनातील अपयश, तुटलेली स्वप्नं, नात्यांतील संघर्ष आणि वैफल्य यांच्या राखेतून पुन्हा उभं राहणं हीच माणसाच्या जगण्याची खरी कसोटी असते. या अर्थाने ‘फिनिक्स’ हा केवळ एक मिथकात्मक पक्षी न राहता तो मानवी जीवनाचा एक प्रभावी रूपक ठरतो. प्रथितयश…
राखेतून उभारी घेणाऱ्या माणसांचा कथासंग्रह : ‘फिनिक्स’
जीवनातील अपयश, तुटलेली स्वप्नं, नात्यांतील संघर्ष आणि वैफल्य यांच्या राखेतून पुन्हा उभं राहणं हीच माणसाच्या जगण्याची खरी कसोटी असते. या अर्थाने ‘फिनिक्स’ हा केवळ एक मिथकात्मक पक्षी न राहता तो मानवी जीवनाचा एक प्रभावी रूपक ठरतो. प्रथितयश कथालेखिका गौरी गाडेकर यांच्या ‘फिनिक्स’ या कथासंग्रहात अशीच राखेतून भरारी घेणारी, पडझडीनंतर स्वतःला सावरत पुढे जाणारी माणसं भेटतात. मोजकं पण दर्जेदार लेखन ही त्यांची ओळख या संग्रहात अधिक ठळकपणे जाणवते. घटनाप्रधान कथानक, चटपटीत संवाद, मध्यमवर्गीय जीवनातील सूक्ष्म संघर्ष आणि व्यक्तिरेखांच्या मनोविश्वाचा वेध घेणारी लेखनशैली यामुळे ‘फिनिक्स’ हा कथासंग्रह वाचकाला अंतर्मुख करतो. मानवी नात्यांमधील गुंतागुंत, आशा-निराशेची आंदोलने आणि जीवनावरची जिद्द यांचा समर्थ आविष्कार या कथांमधून घडतो..
iyemarathichiyenagari.com
February 8, 2026 at 6:20 AM
भारतीय शेतीला संकटांचे बांध…!

हा अर्थसंकल्प भारतीय शेतीच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या घोषणा, निवडणुकांपुरती पिकांची आठवण आणि पायाभूत सुविधांवर अब्जावधींचा खर्च — या सगळ्यात देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा असलेली शेती दुर्लक्षित…
भारतीय शेतीला संकटांचे बांध…!
हा अर्थसंकल्प भारतीय शेतीच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या घोषणा, निवडणुकांपुरती पिकांची आठवण आणि पायाभूत सुविधांवर अब्जावधींचा खर्च — या सगळ्यात देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा असलेली शेती दुर्लक्षित राहते. कडधान्य, तेलबिया, कापूस, दूध आणि साखर यासारख्या क्षेत्रांतील संकटे गंभीर असताना अमेरिकन अनुदानित शेतीसाठी भारतीय बाजारपेठ खुली करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आत्मनिर्भर भारताची भाषा आणि प्रत्यक्ष धोरण यामध्ये प्रचंड विसंगती आहे. हा अर्थसंकल्प विकासाचा नव्हे, तर भारतीय शेतीला संकटांच्या बांधात अडकवणारा दस्तऐवज ठरतो. वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक शेतकऱ्यांना पीक उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालातच नोंदवण्यात आले आहे.
iyemarathichiyenagari.com
February 8, 2026 at 5:19 AM
अमेरिका-भारत संयुक्त निवेदनातील व्यापार करार भारतीय शेतीसाठी ‘मृत्युघंटा’ – अखिल भारतीय किसान सभा

अमेरिकी साम्राज्यवादापुढे मोदी सरकारचे शरणागतीचे धोरण – एआयकेएसचा आरोप नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-एनडीए सरकारने अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणांपुढे पूर्णतः…
अमेरिका-भारत संयुक्त निवेदनातील व्यापार करार भारतीय शेतीसाठी ‘मृत्युघंटा’ – अखिल भारतीय किसान सभा
अमेरिकी साम्राज्यवादापुढे मोदी सरकारचे शरणागतीचे धोरण – एआयकेएसचा आरोप नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-एनडीए सरकारने अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणांपुढे पूर्णतः शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) केला आहे. अमेरिका-भारत संयुक्त निवेदनातील व्यापार करार भारतीय शेतीसाठी ‘मृत्युघंटा’ ठरणार असून, या करारामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात येणार असल्याचे एआयकेएसने म्हटले आहे. या संयुक्त निवेदनातून शेतकऱ्यांच्या भीतीला दुजोरा मिळाला असून, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संसद व शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कृषी क्षेत्रात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही, असा दावा गोयल यांनी केला होता.
iyemarathichiyenagari.com
February 7, 2026 at 5:32 PM
Narendra Modi Surrenders Indian Interests Before US Imperialism

Narendra Modi Surrenders Indian Interests Before US Imperialism Stop Mortgaging Indian Agriculture Piyush Goyal Resorting to Lies and Deceit to Mislead Farmers Vijoo Krishnan, Ashok Dhawale General Secretary President AIKS condemns…
Narendra Modi Surrenders Indian Interests Before US Imperialism
Narendra Modi Surrenders Indian Interests Before US Imperialism Stop Mortgaging Indian Agriculture Piyush Goyal Resorting to Lies and Deceit to Mislead Farmers Vijoo Krishnan, Ashok Dhawale General Secretary President AIKS condemns the Narendra Modi-led BJP-NDA Government's abject surrender before US Imperialism and the Trade Agreement which literally is a death knell for Indian farmers. The US-India Joint Statement confirms the worst fears of farmers. The BJP-NDA Government has mortgaged the lives and livelihoods of India’s farmers. It has once again demonstrated its absolute subservience to U.S. imperialism and sections of domestic monopolies.
iyemarathichiyenagari.com
February 7, 2026 at 5:21 PM
गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची संख्येत दुपटीने वाढ

महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या तीन वर्षांत दुप्पटीने वाढली मुंबई - पर्यटन मंत्रालय देशातील विविध पर्यटन उत्पादने आणि ठिकाणांचा प्रचार करण्यासाठी जागतिक पर्यटन बाजारपेठेत भारताचा एक परीपूर्ण…
गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची संख्येत दुपटीने वाढ
महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या तीन वर्षांत दुप्पटीने वाढली मुंबई - पर्यटन मंत्रालय देशातील विविध पर्यटन उत्पादने आणि ठिकाणांचा प्रचार करण्यासाठी जागतिक पर्यटन बाजारपेठेत भारताचा एक परीपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून प्रचार प्रसार करत आहे. विविध आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार विषयक प्रदर्शने, मेळावे आणि कार्यक्रमांमधील सहभाग, परदेशी पर्यटन नियोजक, प्रसारमाध्यमे आणि इन्फ्लूएन्सरसाठी सहलींचे (एफएएम) आयोजन, पर्यटन रोड-शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचे आयोजन, स्थानिक पर्यटन नियोजक आणि या उद्योग क्षेत्रातील इतर संबंधित भागधारकांसोबतचा संवाद तसेच समाज माध्यमांवरील प्रसिद्धी अशा विविध मार्गांना हा प्रचार प्रसार केला जातो. हे सर्व उपक्रम भारतीय दूतावास, संबंधित उद्योग आणि महाराष्ट्र सरकारसह इतर राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या सहकार्याने राबवले जातात.
iyemarathichiyenagari.com
February 7, 2026 at 4:59 PM
वर्क-लाइफ बॅलन्स नव्हे, हे तर ‘अटेन्शन मॅनेजमेंट’ !

प्रथमेश पालवे यांचे 'रिमोट वर्किंग'वर खुमासदार भाष्य कोल्हापूर: "घरातून काम करताना आपण खरंच घरी असतो का ? लॅपटॉप बंद झाला तरी डोके मात्र कामातच सुरू असते. हा आजच्या रिमोट वर्करचा सर्वात मोठा प्रश्न आहे," अशा शब्दांत प्रथमेश पालवे यांनी आयटी…
वर्क-लाइफ बॅलन्स नव्हे, हे तर ‘अटेन्शन मॅनेजमेंट’ !
प्रथमेश पालवे यांचे 'रिमोट वर्किंग'वर खुमासदार भाष्य कोल्हापूर: "घरातून काम करताना आपण खरंच घरी असतो का ? लॅपटॉप बंद झाला तरी डोके मात्र कामातच सुरू असते. हा आजच्या रिमोट वर्करचा सर्वात मोठा प्रश्न आहे," अशा शब्दांत प्रथमेश पालवे यांनी आयटी क्षेत्रातील तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. वर्डकॅम्प कोल्हापूर (WordCamp Kolhapur) अंतर्गत आयोजित व्याख्यानात त्यांनी 'रिमोट वर्किंग' मधील गंमतीजमती आणि त्यातील आव्हानांवर खुमासदार शैलीत भाष्य केले. अटेन्शन मॅनेजमेंटची गरज व्याख्याना दरम्यान पालवे यांनी सांगितले की, वर्क-लाइफ बॅलन्स म्हणजे केवळ वेळेचे नियोजन (Time Management) नसून ते 'अटेन्शन मॅनेजमेंट' (Attention Management) आहे. रिमोट वर्किंगमध्ये माणूस घरी असूनही कामाच्या टेन्शनमुळे कुटुंबात मानसिकरीत्या उपस्थित नसतो.
iyemarathichiyenagari.com
February 7, 2026 at 3:38 PM
अरिष्टकाळाचे भयसूचन : काळाच्या मनाची कविता

'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन…
अरिष्टकाळाचे भयसूचन : काळाच्या मनाची कविता
'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन मांडतात. हे अरिष्ट केवळ व्यक्तिगत आयुष्यात वादळे उठवण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते लोकजीवनाचे सामाजिक आणि राजकीय अंग छेदत खूप खोलवर शिरत असल्याचे संकेत या कवितेत आहेत. अफवा, संभ्रम, संशय, भीती, मुस्कटदाबी या गोष्टींचा धूर्तपणे वापर करीत चालून येणारे हे अरिष्ट पाशवी बहुमताच्या जोरावर समताधिष्ठित मानवी जीवनशैलीवर आघात करीत प्रसंगी संविधानाच्या गाभ्याला नख लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा गंभीर इशारा ही कविता देते.
iyemarathichiyenagari.com
February 7, 2026 at 7:31 AM
साम्याची अनुभूती म्हणजे पलायन नव्हे, तर समरसतेची पूर्णता

जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश…
साम्याची अनुभूती म्हणजे पलायन नव्हे, तर समरसतेची पूर्णता
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो, त्यास साम्य म्हणतात. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतून जे तत्त्वज्ञान उलगडले आहे, ते केवळ तत्वचिंतन नाही, तर मानवी जीवनाला अंतर्मुख करणारी एक आध्यात्मिक अनुभूती आहे. अष्टम अध्यायातील ही ओवी त्या अनुभूतीच्या सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे. ही ओवी वरवर पाहता सोपी वाटते; परंतु तिच्या गर्भात अद्वैत तत्त्वज्ञानाचा गाभा सामावलेला आहे. ज्ञानदेव येथे ‘साम्य’ या शब्दाचा उपयोग करतात, तो साध्या समानतेच्या अर्थाने नव्हे, तर भेद नष्ट होऊन एकत्वात विलीन होण्याच्या अवस्थेच्या अर्थाने करतात.
iyemarathichiyenagari.com
February 7, 2026 at 6:33 AM
भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !

स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व काही घरबसल्या मिळू लागले. वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्तींना ऑनलाईन सेवांचा…
भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !
स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व काही घरबसल्या मिळू लागले. वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्तींना ऑनलाईन सेवांचा मोठा फायदा झाला. नोकरीच्या मुलाखती, कार्यालयीन कामे, घरून काम (वर्क फ्रॉम होम) यामुळे विशेषतः महिलांना दिलासा मिळाला. त्यामुळे मोबाईल हा वरदानच वाटू लागला. मात्र कोणत्याही तंत्रज्ञानाला दोन बाजू असतात – फायदे आणि तोटे. सौ. सरीता पाटील (पंडित)वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे भ्रमणध्वनीचा (मोबाईल) इतिहास पाहिला, तर १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी नोकियाच्या हँडसेटवरून केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना केलेला पहिला सार्वजनिक कॉल हा एक ऐतिहासिक क्षण ठरला.
iyemarathichiyenagari.com
February 6, 2026 at 7:29 PM
शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा भाग व्हावे

सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे. कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अॅप…
शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा भाग व्हावे
सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे. कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अॅप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. तरी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करावे आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.
iyemarathichiyenagari.com
February 6, 2026 at 6:43 PM
विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !

साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य - संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली…
विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !
साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य - संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात कवींनी निसर्ग, सामाजिक जाणीव आणि राजकीय कोंडी अशा विविध विषयांवर आपल्या कवितांमधून मनमोकळे भाष्य केले. विद्रोहाच्या तीव्र सूरांना प्रेमाच्या हलक्या-फुलक्या किस्स्यांची जोड देत कवींनी उपस्थित रसिकांचे मन जिंकले. वय झाले तरी ‘प्रेमाने वेणीत गजरा माळायला अजूनपर्यंत कोणी मिळालाच नाही’ अशी कविता सादर करत कवयित्री दर्शना पाताडे यांनी मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी मिळत नसल्याची आजच्या विवाहसंस्थेतील समस्या प्रभावीपणे उलगडून दाखवली.
iyemarathichiyenagari.com
February 6, 2026 at 7:24 AM
…ही जाणीव टिकवणे म्हणजे खरी मुक्ती

शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - शरद ऋृतुच्या आरंभी ज्याप्रमाणें ढग आकाशांत नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋृतूच्या शेवटीं जसे तें पुनः उत्पन्न होतात. ही ओवी केवळ ऋतुबदलाचे…
…ही जाणीव टिकवणे म्हणजे खरी मुक्ती
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - शरद ऋृतुच्या आरंभी ज्याप्रमाणें ढग आकाशांत नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋृतूच्या शेवटीं जसे तें पुनः उत्पन्न होतात. ही ओवी केवळ ऋतुबदलाचे वर्णन करत नाही, तर मानवी अंतःकरणात घडणाऱ्या चैतन्याच्या चढउतारांचे, ज्ञानप्राप्तीचे आणि अज्ञानाच्या पुनरागमनाचे सूक्ष्म संकेत देते. शरद ऋतू, ग्रीष्म ऋतू, ढग, आकाश — हे सगळे प्रत्यक्ष निसर्गचित्र नसून, आत्मिक अवस्थांचे रूपक आहे. शरद ऋतूच्या आरंभी आकाश स्वच्छ होते. पावसाळ्याच्या दिवसांत ज्या ढगांनी आकाश व्यापलेले असते, ते हळूहळू विरघळू लागतात.
iyemarathichiyenagari.com
February 6, 2026 at 7:04 AM
रानवेड्याची शोधयात्रा : अनुभव, थरार आणि आत्मभान

एका रानवेड्याची शोधयात्रा – पुस्तक परिचय कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत,…
रानवेड्याची शोधयात्रा : अनुभव, थरार आणि आत्मभान
एका रानवेड्याची शोधयात्रा – पुस्तक परिचय कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत, पोटर्‍या लटपटेपर्यंत, बूट फाटेपर्यंत, मांड्या दुखेपर्यंत, पाठीचा कणा मोडेपर्यंत हिंडले. नादावल्यासारखे परत परत झाडीमध्ये फिरत गेले. जंगलातील सर्व ऋतूंमधीलरूप, रंग, नाद, स्पर्श अनुभवले. त्यामधला रस घेतला आणि तितक्याच रसिलेपणाने, शब्दांमधून तो अनुभव वाचकांपर्यंत पोचवला. उज्ज्वला केळकर पहिल्या प्रकरणात लेखकाने आपण मदुमलाईच्या जंगलात का व कधी गेलो, ते सांगितलय. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ते रसायनशास्त्रात नापास झाले.
iyemarathichiyenagari.com
February 5, 2026 at 7:25 PM
जे मोजदादीपलीकडे आहे, तेच खरे सत्य

तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - त्या ब्रह्मलोकांत जेव्हां दिवस उगवतो, तेव्हां ज्याची मोजदाद कोठेही करतां येत नाही, असें लोन असलेलें जग आकाराला येतें.…
जे मोजदादीपलीकडे आहे, तेच खरे सत्य
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - त्या ब्रह्मलोकांत जेव्हां दिवस उगवतो, तेव्हां ज्याची मोजदाद कोठेही करतां येत नाही, असें लोन असलेलें जग आकाराला येतें. ही ओवी विश्वनिर्मितीच्या अत्यंत सूक्ष्म, कालातीत आणि अद्वैत स्वरूपाचा उलगडा करते. “तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे” या एका ओळीपासून संत ज्ञानेश्वर आपल्याला काळ, सृष्टी, अव्यक्त आणि व्यक्त या सगळ्यांच्या पलीकडच्या सत्याकडे घेऊन जातात. या ओवीचे निरूपण करताना आपण केवळ शब्दार्थापुरते थांबत नाही, तर त्यामागील तत्त्वज्ञान, अनुभव आणि अंतर्मुख करणारा आशय समजून घेणे आवश्यक आहे.
iyemarathichiyenagari.com
February 5, 2026 at 4:41 AM
विलिनीकरण रोखणारे नायक की खलनायक ?

स्टेटलाइन – जुलै २०२३ मधे अजित पवार बंडाचा झेंडा फडकावून चाळीस आमदारांसह भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले तरी त्यांनी काकांबरोबरचे संबंध तोडले नव्हते. कुटुंबात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी त्यांनी सुप्रियांबरोबर भावा बहिणीचे नाते कायम राखले होते.…
विलिनीकरण रोखणारे नायक की खलनायक ?
स्टेटलाइन – जुलै २०२३ मधे अजित पवार बंडाचा झेंडा फडकावून चाळीस आमदारांसह भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले तरी त्यांनी काकांबरोबरचे संबंध तोडले नव्हते. कुटुंबात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी त्यांनी सुप्रियांबरोबर भावा बहिणीचे नाते कायम राखले होते. गेल्या काही महिन्यात शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांबरोबर चौदा बैठका झाल्या. दादांबरोबर आपल्या दहा बैठका झाल्याचे जयंत पाटील स्वत: सांगत आहेत. या बैठकांचे फोटो किंवा व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. डॉ. सुकृत खांडेकर अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्युनंतर ज्या घाईने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली व ज्या वेगाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांना देण्यात आली, ती तत्परता पाहून सारा महाराष्ट्र आश्चर्यचकीत झाला.
iyemarathichiyenagari.com
February 4, 2026 at 6:51 PM
काळाला ओळखतो, तो काळाच्या गुलामगिरीतून होतो मुक्त

जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - चार युगांच्या जेव्हां हजार फेऱ्या होतात, तेव्हां ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पाहा, त्याचप्रमाणे…
काळाला ओळखतो, तो काळाच्या गुलामगिरीतून होतो मुक्त
जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - चार युगांच्या जेव्हां हजार फेऱ्या होतात, तेव्हां ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पाहा, त्याचप्रमाणे हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होतें. या चार ओळींत माउलींनी काळ, विश्व, सृष्टी आणि मानवी अहंकार यांना एकाच वेळी उघडं पाडलं आहे. आपण ज्याला काळ म्हणतो, तो आपल्या दृष्टीने मोजता येणारा आहे—दिवस, रात्र, महिने, वर्षं, आयुष्य. पण ज्ञानेश्वर सांगतात, हा काळ सार्वत्रिक नाही; तो सापेक्ष आहे. जसं आपण एखाद्या मुंगीसाठी पर्वत आहोत, तसं ब्रह्मांडाच्या दृष्टीने आपण क्षणभरही नाही.
iyemarathichiyenagari.com
February 4, 2026 at 7:44 AM
गावाकडची गोष्ट…

कोल्हापूर ः 'गावगाडा' (त्रिं. ना. आत्रे), 'आमचा गाव बदलापूर' (ना. गो. चाफेकर), 'गावगाडा... शतकानंतर' (अनिल पाटील-सुर्डीकर), 'कोसळता गावगाडा' (उल्का महाजन) ते 'गावकळा' (लक्ष्मण महाडिक) आणि 'गावकथा' (अतुल मुळीक) याही पलीकडे आणखी एक गोष्ट आहे, 'गावाकडची गोष्ट..!' विष्णु पावले नावच…
गावाकडची गोष्ट…
कोल्हापूर ः 'गावगाडा' (त्रिं. ना. आत्रे), 'आमचा गाव बदलापूर' (ना. गो. चाफेकर), 'गावगाडा... शतकानंतर' (अनिल पाटील-सुर्डीकर), 'कोसळता गावगाडा' (उल्का महाजन) ते 'गावकळा' (लक्ष्मण महाडिक) आणि 'गावकथा' (अतुल मुळीक) याही पलीकडे आणखी एक गोष्ट आहे, 'गावाकडची गोष्ट..!' विष्णु पावले नावच किती भारी वाटतं ! मातीतून काही उगवून आल्याचं जाणवतं. हो ! ही 'गोष्ट' खरी आहे. या गोष्टीत 'खेडे' आहे. ज्या खेड्याने दृष्टी दिली, ते खेडे. विलासदादा तुळसणकर यांचे. त्यांनीच ही गोष्ट सांगितली आहे. खेड्याची आणि दहा किलोमीटरच्या आतील गावांची. अशी खेडी... अशी मान्सं... त्यांची वाक-वळणं... त्यांचे सण... त्यांचे बंध... असं बरंच काही की, जी या 'आपल्या'च नजीकचं पण आपल्या 'जगात' नसणारं.
iyemarathichiyenagari.com
February 4, 2026 at 6:39 AM
अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात

पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित करण्यात आले आहे. सन २०१८ पासून…
अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात
पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित करण्यात आले आहे. सन २०१८ पासून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या संमेलनाचा उद्देश सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणाईमध्ये आवश्यक वैचारिक, सांस्कृतिक व बौद्धिक गुणांचा विकास घडवणे हा आहे. भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि विचारप्रवाहांचा अनोखा संगम आहे. अशा देशात राष्ट्रजोडणीसाठी विविध भारतीय भाषांना एकमेकांशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य प्रभावीपणे साध्य करण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे भाषानुवाद. अनुवाद हा केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलेला शब्दप्रवास नसून, तो त्या-त्या प्रांतातील सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक देवाण-घेवाणीचा सशक्त पूल ठरतो, अशी भूमिका या संमेलनातून मांडली जाणार आहे.
iyemarathichiyenagari.com
February 3, 2026 at 7:07 PM
स्वप्नातील महापूरात बुडायचे नसेल तर चला उठा जागे व्हा..

नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणें जे माझ्या स्वरूपी प्राप्त…
स्वप्नातील महापूरात बुडायचे नसेल तर चला उठा जागे व्हा..
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणें जे माझ्या स्वरूपी प्राप्त झालें, ते पुरुष संसारबंधनांत सांपडत नाहीत. ज्ञानदेवांची ही ओवी म्हणजे अनुभवाच्या भाषेत मांडलेले अद्वैताचे अत्यंत जिवंत चित्र आहे. स्वप्न आणि जागृती यांचा दाखला देत, ते मुक्त पुरुषाची अवस्था इतक्या सहजतेने उलगडतात की वाचकाच्या मनात विचार न राहता अनुभूती निर्माण होते. स्वप्नातील महापूर कितीही भयानक असला, त्यात माणूस बुडलेला, वाहून गेलेला, गुदमरलेला दिसला तरी जाग आली की त्या सगळ्याचा मागमूसही राहत नाही.
iyemarathichiyenagari.com
February 3, 2026 at 7:57 AM